Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?

Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ? : प्रेमी युगूलांसाठी खास असणारा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी. जगभर तरूणाई हा दिवस व्हेलेंटाईन डे (Valentine Day Meaning In Marathi) म्हणून साजरा करतात. आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती जवळ या दिवशी आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात. व्हेलेंटाईन डे चा आनंद द्विगुणित करण्यासाठी या दिवशी खास गिफ्ट्स देखील दिली जातात.

Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?

खरं तर आयुष्यातील प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा व्हायला हवा आणि हे अनेक जण आपल्या आयुष्यात करतातत देखील. जगातील प्रत्येक बंधन हे प्रेमाने बांधलेले असते. जर प्रेम नसेल तर आयुष्यात आनंद येऊ शकणार नाही. तसंच प्रेमाबाबत आपल्या मनातील गोष्टी या समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी कोणताही मुहूर्त नसतो. प्रेमाचा आदर करणे, प्रेमाची भावना हा एक सुंदर अनुभव आहे. एकमेकांबरोबर आयुष्य काढताना अनेक चढउतार तर येतातच.

पण त्याग, विश्वास आणि प्रेमाने हे आयुष्य एकत्र अप्रतिमरित्या निघून जाते आणि त्याच प्रेमाचा वारंवार आठवण करून देणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentine Day Meaning In Marathi). जे प्रेम तुम्ही तुमच्या मनात सतत अनुभवता तेच तुम्ही ज्या व्यक्तीवर करता त्यांना सांगणे म्हणजे व्हॅलेंटाईन डे (valentine day information in marathi). पण हे शब्दात मांडणे नक्कीच सोप्पे नाही. 

अशाच प्रेमाचा हा अनुभव जेव्हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यात येतो त्या दिवसाला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day Meaning In Marathi) असं म्हटलं जातं. हा दिवस प्रेमाचा दिवस (valentine day mhanje kay marathi ) म्हणून साजरा करण्यात येतो. आयुष्यात प्रेम म्हणजेच सर्व काही आहे आणि त्यासाठी वेळ काढणंही महत्त्वाचे आहे. सध्या वेळेची कमतरता खूपच भासते आणि म्हणूनच प्रेमाचा हा एक दिवस प्रेमी युगुलांना एकत्र वेळ देण्यासाठी योग्य ठरतो. कारण वेळ निघून गेली तर ती परत येणार नाही हेच हा दिवस सांगत असतो.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
50+ रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi
50+ प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi
50+ चॉकलेट डे च्या खास शुभेच्छा | Chocolate Day Quotes In Marathi
टेडी डे मराठी कोट्स | Teddy Day Marathi Status
प्रॉमीस डे शुभेच्छा | Promise Day Quotes Marathi
किस डे शायरी मराठीत | Kiss Day Quotes In Marathi
हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi
Valentine Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

कशी झाली व्हॅलेंटाईन्स डेची सुरुवात ?

‘ऑरिया ऑफ जॅकोबस डी वॉराजिन’ (Valentine Day Meaning In Marathi) नावाच्या पुस्तकानुसार सेंट व्हॅलेंटाईन हे रोमचे धर्मगुरू होते. जगात प्रेम वाढवण्यावर त्यांचा विश्वास होता. त्याच्यासाठी आयुष्य फक्त प्रेमात होते. पण या शहराचा राजा क्लॉडियस याला त्याचे बोलणे आवडले नाही. राजाला वाटले की पुरुषांची बुद्धिमत्ता आणि शक्ती या दोन्ही गोष्टी प्रेम आणि लग्नाने संपतात. या कारणास्तव त्याच्या राज्यात सैनिक आणि अधिकारी विवाह करू शकत नव्हते.

सेंट व्हॅलेंटाईनने राजा क्लॉडियसच्या या आदेशाला विरोध केला आणि रोमच्या लोकांना प्रेम आणि विवाहासाठी प्रेरित केले. एवढेच नाही तर अनेक अधिकारी आणि सैनिकांचे विवाहही त्यांनी केले. यामुळे राजा संतप्त झाला आणि त्याने १४ फेब्रुवारी २६९ रोजी सेंट व्हॅलेंटाइनला फाशी दिली.(Valentine Day Meaning In Marathi) त्या दिवसापासून दरवर्षी हा दिवस ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाईनने मृत्यूशय्येवर असलेल्या जेलरची अंध मुलगी जेकोबस यांना डोळे दान केले होते असे म्हटले जाते. सेंटने जेकोबसला एक पत्र देखील लिहिले, ज्याच्या शेवटी त्याने ‘युवर व्हॅलेंटाईन’ लिहिले. प्रेमासाठी बळी पडलेल्या व्हॅलेंटाइनची ही कथा होती.

Valentine Day Meaning In Marathi
Valentine Day Meaning In Marathi

कसा करतात व्हॅलेंटाईन डे साजरा | Celebration Of Valentines Day In Marathi

व्हॅलेंटाईन डे च्या एक आठवडा आधीपासूनच प्रेमाच्या या दिवसांना सुरूवात होते. नक्की कोणकोणते दिवस साजरे करण्यात येतात पाहूया. 

7 फेब्रुवारी (7 February) – या दिवसाला ‘रोझ डे’ (Rose Day) असं म्हणतात. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तील या दिवशी गुलाब देण्यात येते. गुलाबाच्या रंगानुसार याचा अर्थही आहे.

पांढरे गुलाब (White Rose)White Rose Says ‘I am Sorry’ – पांढऱ्या गुलाबाचा अर्थ मला माफ कर
पिवले गुलाब (Yellow Rose)Yellow Rose Says ‘You are my Best Friend’ – पिवळ्या गुलाबाचा अर्थ तू माझा अत्यंत जवळचा/जवळची मित्र/मैत्रीण आहेस
गुलाबी गुलाब (Pink Rose)Pink Rose Says ‘I Like You’ – गुलाबी गुलाबाचा अर्थ तू मला आवडते/आवडतोस
लाल गुलाब (Red Rose)Red Rose Says ‘I Love you’ – लाल गुलाबाचा अर्थ माझं तुझ्यावर प्रेम आहे

8 फेब्रुवारी (8 February) – या दिवसाला ‘प्रपोझ डे’ (Propose Day) साजरा करण्यात येतो. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्याचा दिवस. हा दिवस अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती केल्या जातात, जेणेकरून प्रपोज डे कायम लक्षात राहील. ज्यांना समोर भावना वक्त करण्याची भीती असते ते प्रपोझ डे संदेश पाठवून भावना व्यक्त करतात. 

9 फेब्रुवारी (9 February) – या दिवसाला ‘चॉकलेट डे’ (Chocolate Day) साजरा करण्यात येतो. एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगून झाल्यावर तोंड गोड करायची पद्धत विसरून कसं बरं चालेल? त्यामुळे हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो. 

10 फेब्रुवारी (10 February) – या दिवसाला ‘टेडी बेअर डे’ (Teddy Bear Day) साजरा करण्यात येतो. या दिवशी एकमेकांच्या आवडीचे गिफ्ट देण्याला प्राधान्य देण्यात येते. आपल्या प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी हे गिफ्ट देण्यात येते. सहसा टेडी बेअर देण्यात येते, कारण हे दिसायला अत्यंत सुंदर असते आणि मुलींना अधिक आवडते. 

11 फेब्रुवारी (11 February) – या दिवसाला ‘प्रॉमिस डे’ (Promise Day) साजरा करण्यात येतो. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देण्याचा हा दिवस आहे. या दिवशी प्रेमात आकंठ बुडालेली जोडपी एकमेकांना साथ देण्याचे वचन देऊन आपल्या प्रेमावर शिक्कामोर्तबच करतात. 

12 फेब्रुवारी (12 February) – या दिवसाला ‘किस डे’ (Kiss Day) साजरा करण्यात येतो. एकमेकांजवळ आलेल्या दोन व्यक्ती प्रेमात आकंठ बुडल्यानंतर या क्षणाला कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ठेवण्यासाठी किस करतात अर्थात चुंबन घेतात. आयुष्यभर या आठवणी लक्षात राहतात. किस करण्याचे फायदेही अनेक आहेत. 

13 फेब्रुवारी (13 February) – या दिवसाला ‘हग डे’ (Hug Day) अर्थात आलिंगन दिवस साजरा करण्यात येतो. कोणत्याही गोष्टी शब्दाने व्यक्त होत नसतील तर मिठीत आणि स्पर्शाने सर्व काही व्यक्त होत असते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो. एकमेकांना मिठीत घेऊन एकमेकांची साथ देण्याचा अनुभव हा खासच असतो. जो जोडप्याला कठीण प्रसंगातही बांधून ठेवतो. 

14 फेब्रुवारी (14 February) – या दिवसाला ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day Meaning In Marathi) अर्थात प्रेमाचा दिवस साजरा करण्यात येतो. हा पूर्ण दिवस एकमेकांच्या साथीने घालविण्याचा दिवस आहे. आयुष्यभराच्या आठवणी गोळा करण्याचा आणि आनंदात राहण्याचा दिवस आहे. 

प्रेमासाठी अर्थात प्रत्येक दिवस आहे.(Valentine Day Meaning In Marathi)हे कितीही खरं असलं तरीही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची एक वेगळीच मजा आहे आणि ती प्रत्येकाने आयुष्यात अनुभवायला हवी. हा व्हॅलेंटाईनचा दिवस तुम्हीही करा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर साजरा आणि दरवर्षी नव्या आठवणी जोडत जा!

Leave a Comment