लग्नासाठी खास निमंत्रण संदेश | Wedding Invitation Message In Marathi : भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात आधी परमेश्वराला म्हणजेच कुलदेवतेला आमंत्रण पत्रिका देऊन मगच नातेवाईक, मित्रमंडळींना आमंत्रण देण्यास सुरूवात केली जाते. तुमचा विवाहसोहळा खास करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे खास लग्न निमंत्रण संदेश..
लग्नासाठी खास निमंत्रण संदेश | Wedding Invitation Message In Marathi
नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण
ब्रम्हसुतामध्ये बांधली गाठ प्रेमाच्या नात्याची, पृथ्वी तलावर शोभे जोडी…. आणि ….. ची, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आमच्या आनंद सोहळ्यातत आपण सर्वांनी उपस्थित राहून वधू – वरांना शुभार्शीवाद आणि सदिच्छा द्याव्या ही विनंती
Wedding Invitation Message In Marathi
पहिला प्रहर एक क्षण, मेंदीचा बहर एक क्षण, लगीन घाई एक क्षण, वाजे सनई एक क्षण, अंतरपाठ एक क्षण, सर्व सोनेरी क्षणांचा हा जणू एक सण…म्हणूनच आपणांस या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अगत्याचे आमंत्रण
अग्नी नारायणाच्या साक्षीने, …. आणि … हे रेशमाच्या बंधनात, वाद्यांच्या गजरात, सनईच्या सुरात, हळदी आणि मेंदीच्या रंगात जीवनसाथी होत आहेत. अशा मंगल प्रसंगी आपले शुभार्शीवाद मिळावेत यासाठी आपणांस आणि परिवारास आग्रहाचे आमंत्रण
विवाह! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं, एक जाणीव. नव्याने जुळणारी एक रेशीम गाठ! एक स्वप्न… दोन डोळ्यांचं, एक हुरहूर… दोन मनांची, एक चाहूल… सात जन्मांची, अशा मंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपणांस विवाहाचे अगत्याचे आमंत्रण.
साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवरायांच्या महाराष्ट्रात, हिंदू संस्कृतीप्रमाणे मराठमोळ्या वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. तरी आपण या सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवावी.
Wedding Invitation Message In Marathi
आणि …. ची जमली आता जोडी, लग्नाला येऊन सर्वांनी वाढवा या मंगल कार्याची गोडी
लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर… तुमचा प्रेमळ आर्शीवाद, हाच आमचा आहेर
लग्नकार्य म्हणजे, सुख- आनंदाची सभा, तुमच्या येण्याने वाढेल समारंभाची शोभा
यंदा घातला आहे…. लग्नाचा घाट, उपस्थित राहून आपण वाढवावा शुभकार्याचा थाट
लग्नाचे बेस्ट आमंत्रण संदेश – Best Wedding Invitation Ideas In Marathi
जन्म दिला पित्याने, गाठ मारली ब्रम्हदेवाने, होईल आज विवाह अग्नीदेवाच्या साक्षीने, शुभ कार्य सिद्धीस जाईल श्री गणेशाच्या आर्शीवादाने. संसाराची सुरूवात होईल सप्तपदीने, मंगलप्रसंगाची शोभा वाढू दे तुमच्या येण्याने
विवाह म्हणजे आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान, दोन जीवांना जोडणारा एक नाजूक धागा, दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध, सात जन्मांच्या गाठी जुळवणारा हा सोहळा, आपल्या शुभेच्छा आणि आर्शीवादा शिवाय अपूर्ण… म्हणूनच आपणांस लग्नसोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण
Wedding Invitation Message In Marathi
नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय, कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्नीदेवतेच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आर्शवादाने आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहात आपले शुभार्शिवाद… आपणांस लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण
ऋणानूबंध ठाऊक नव्हते.. एकमेकांना शोधत होते, नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले दोन मनांचे, असे हे बंध रेशमाचे, अथांग हा सागर संसाराचा, विवाह होतोय…. आणि …. चा, आर्शीवाद असो मान्यवरांचा. आपले पणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीने आगमन तुमचे !!!
विश्वा दिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी केला संसार पंढरी, शिवरायांनी रोवला स्वराज्यांचा झेंडा, असा महाराष्ट्र धर्म राडवेडा, याच मातीतील अभंग आणि ओव्या विवाहास येत आपण ,…. आणि …. यांच्यावर मंगल अक्षता पाडाव्या
Wedding Invitation Message In Marathi
लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे एक नवा अनुबंध
विवाह म्हणजे आजन्म साथ, आनंद आणि सुखाची बरसात, …. आणि…. यांची जमली जोडी…. आपण येऊन त्यात घालावी आर्शीवादाची साथ
सप्तपदींची सात पावले म्हणजे सात जन्मांच्या गाठी, यायलाच हवे तुम्हाला … आणि …. यांच्या विवाहासाठी,…
सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची, पृथ्वीतलांवर जोडी शोभे …. आणि … ची, ईश्वरानेच गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्मींची पुण्याई…. घराण्याची, सहपरिवार येऊन शोभा वाढवावी आपण मंगल कार्यांची…
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Wedding Anniversary Wishes Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Mummy Papa Anniversary Wishes Marathi – आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Dada Vahini Anniversary Wishes Marathi (100+)
- Wedding Anniversary Wishes Marathi – लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जन्माची, मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची, आपला सहभाग क्षणाचा पण आर्शीवाज आयुष्यभराचा… या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन वधू वरांना आर्शावाद द्यावे.
Lagnache Nimantran Message in marathi
लग्न इतक्या गडबडीत ठरलं आणि लग्नाचा मुहूर्तही पण खूपच लवकर ठरला… लग्नाची तयारी करायला खूप कमी वेळ मिळाला, या गडबडीत तुमच्या पर्यंत लग्न पत्रिका येवो न येवो माझे प्रेमाचे आणि आग्रहाचे निमंत्रण मात्र नक्कीच आहे…
तुमचा आर्शीवाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना… आणि …. च्या रेशीमगाठी
Wedding Invitation Message In Marathi
मंगल प्रंसग आणि सप्तपदी, असू दे तुमची साथ, वधू वरांवर असू दे तुमचे प्रेम आणि आर्शीवादाचा हात
आईभवानीचा आर्शीवाद राहो, तुमच्या पाठी, लग्न कार्याची शोभा वाढवा पाहत जुळणाऱ्या नव्या रेशीमगाठी
आणि …. चे जुळले आहेत सप्तसूर, तुमच्या उपस्थित राहण्याने वाढेल लग्नसोहळ्यातील आनंद भरपूर
आणि …. ची जुळणार, जन्मोजन्मींची नाती, उपस्थित राहून उधळा तुमच्या आर्शीवादाचे मोती
लग्नसोहळ्याकडे लक्ष लागले आहे साऱ्या विश्वाचे, आहेरात आणा फक्त अनमोल आर्शीवाद मोलाचे
Wedding Invitation Message In Marathi
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्यांची सात जन्मांसाठी झालेली सुरेख गुंफण… अशा मंगल सोहळ्यासाठी आपणांस आग्रहाचे निमंत्रण
विवाह हे दोन जीवांचे, दोन प्रेमाचे आणि दोन कुटुंबाचे मिलन आहे, अशा या सुंदर मिलनाचे साक्षीदार होण्यासाठी आपणांस विवाहसोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण
लग्न म्हणजे रेशीमगाठ, अक्षता आणि मंगलाष्टकांची सात, दोनाचे होणार आता चार हात, दोन जीव गुंतरणार एकमेकांत, स्वप्न दोघांचे लग्नाचे, मंगलाष्टकांच्या सुरात पूर्ण होणार, तुमच्या शुभार्शीवादाने नव्या संसाराची सुरवात होणार