Akhil Bhartiya Jokes | आखिल भारतीय मराठी जोक्स

Akhil Bhartiya Jokes | आखिल भारतीय मराठी जोक्स

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी जोक्स

Akhil Bhartiya Jokes | आखिल भारतीय मराठी जोक्स

माझ्या सर्व १0 वी च्या मित्रांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.
टिप: २ रूपये जास्त जाऊ दया पण
अक्षरे दिसतील अशाच कॉप्याच्या झेरॉक्स मारा…
– अखिल भारतीय “तुझं झालं की मला दे”संघटना.

तिने मला पाहिले
मी तिला पाहिले,
आणि असाच
पाहता पाहता
माझे 4 विषय राहिले
अखिल भारतीय एक ‘अनुभवी’ विद्यार्थी संघटना..

आज तिला propose करायच ठरवल..
उठलो गेलो घरात, जाताना रश्शी घेतली, आणि निघालो तिच्याकडे..,
जर ती हो बोलली तर ठिक नायतर…. जर ती नाय म्हणाली तर येताना जवळ कुठे जर
ऊस तोडला असेल तर वाडे घेउन येतो म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.
पोरगी राहिली निदान म्हैस तरी खुश . . . . . . .
अखिल भारतीय नुसता धूर संघटना…

शाळेतील सर्वात खतरनाक अनुभव
जेव्हा प्राथनेला उभा राहायचो
आणि
स्टेज वरुन सुचना ‪‎यायची‬ काल ‪‎पळून गेलेले समोर‬ या
अन……सगळे हरामखोर आपल्या कडे वळुन पहायचे
आणि बोलायचे जाना पुढे
अखिल भारतीय शाळेतून पळून जाणारी संघटना..

मीडिया रिपोर्टर: ‘पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर तुमची काय प्रतिक्रिया ?
गण्या: ‘किती पण वाढू दे.
आपल्याला काय बी फरक पडत नाय. आपण ५० चच टाकत असतो.
अखिल भारतीय ५० चच टाक संघटना..

बायको: माझ्यासाठी एवढे कर, वाघाची शिकार कर,
मला वाघाचे कातडे आपल्या दिवाणखान्यात लावायचे आहे..
नवरा: हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग…
बायको: ठीक आहे, तुझे whatsapp मेसेजेस दाखव…
नवरा: वाघ साधा हवा का पांढरा…..?
– अखिल भारतीय बायकोला घाबरून लगेच ऐकणारी संघटना..

एक सत्य
१०० रूपये कमावल्याच्या आनंदापेक्षा
१० रूपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो.
अखिल भारतीय फाटकी नोट चालवण्याची संघटना..

चीन क्रिकेट का खेळत नाही ?
कारण टेकनीकली प्रॉब्लम आहे.
सर्वांचे चेहरे एक सारखेच असतात,
जो आउट होनार तोच पुन्हा तोंड धुवुन येउ शकतो.
अखिल भारतीय माझ्यासारखाच दिसतो संघटना…

मिरवणुकीत “पैलवान आला रे, पैलवान आला” गाण? लागल की.
“बरगड्या” दिसनार्याला पण वाटत हे गाण माझ्यासाठीच लावल आहे..
ते अजून बरगाड्या ताणून नाचत..
अखिल भारतीय १ तास जीम करून १२ अंडी खाणारा संघ

Leave a Comment