Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ५ : माझ्या नकळत हातांचा स्पर्श, तुझ्या कोमल हाताना होतो, अशी नजर झुकवते तू, नी पाहून हर्ष मला होतो…
Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ५
💘 एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे
मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
💘 एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी
💘 एक मनी आस एक मनी विसावा
तुझा चंद्र्मुखी चेहरा रोजच नजरेस पडावा
नाहीतर तो दिवसच नसावा.
💘 एकटेपणा तेव्हा वाटत नाही…
जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो…
जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते
💘 एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल
💘 एका इशाऱ्याची गरज असेल हृदयाला किनाऱ्याची गरज असेल
मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन, जिथे तुला आधाराची गरज असेल….
💘 एका मिनिटा मध्ये ७२ वेळा आपलं हृदय धडधडत असते ………….
पण तुझे हृदय एका मिनिटात एकदाच जरी धडधडले तरी तू जिवंत राहू शकशील, …………
कारण एका मिनिटात ७१ वेळा माझे हृदय तुझ्यासाठीच धडधडत असते ♥ ♥ ♥
Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ५
💘 एकांत क्षणी…
कधी तरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं आणि
सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.
💘 एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे ,
समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे ,
मान अपमान प्रेमात काहीच नसत ,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .
💘 एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो जीवनच संपल्यावर
आपण त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह १
- Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह २
- Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ३
- Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४
- मराठी पहिल्या प्रेमाच्या कविता
💘 ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते
नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते..
माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते
शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते..
डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते
हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते..
अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते
रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.
💘 ओंठ जरी माझे मिटलेले डोळे मात्र उघडे होते
तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते
💘 ओठ माझे तुझ्या ओठांवर ,
येऊन विसावतात…
ते क्षण एकांतात आठवले ,
तरी लाजवतात…
💘 ओठांनी अबोल असली तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत खुप काही लपवायचे
💘 ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही
💘 ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात,
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो
💘 ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे
💘 कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि,
ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो कदाचित मी तो नाही
ज्याची तू वाट बघतेस पण ती तूच आहेस जिची
मी आतुरतने वाट बघत असतो कदाचित
मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करतेस
पण ती तूच आहेस जिच्यावर
मी अगदी जीवापाड प्रेम करतो
💘 कधि तू कधि मी एकमेकांशी भांडू ….
राग ओसरल्यावर मात्र पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू….
💘 कधी अचानक रुसतेस मनापासुन हसतेस तू,
साद घालते मनास ऐसे जीवनगाणे तू,
💘 कधी इतकं प्रेम झालं….
काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलंस….
काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच नाही राहवत.
💘 कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
💘 कधीतरी माझेही आयुष्य तुझ्या प्रेमाने उजळेल
माझ्या प्रीतीचे चांदणे तुझ्याहि डोळ्यातून विरघळेल
💘 करतो किती गं बहाणे,
तुला रोज भेटायचे…
अन् तुला हे वेडे, सांग कधी गं कळायचे…
💘 कळू दे प्रेम जरा ,
तुझ्याही ह्रदयातले…
सोपे होईल मग मलाही ,
सांगणे मनातले…
💘 कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला
प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला