दत्तात्रेय जयंती 2023 / Datta Jayanti 2023 Wishes मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा दत्तात्रेय जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेय हे भगवान त्रिमूर्तीचे मिश्र स्वरूप आहे. दत्तात्रेय जयंतीला तिन्ही देवतांच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते.
असे मानले जाते की दत्तात्रेय भक्तांचे स्मरण करून त्यांना मदत करतात आणि त्यांचे सर्व संकट दूर करतात. या वर्षी 2023 मध्ये भगवान दत्तात्रेय जयंतीची तारीख, पूजा वेळ आणि महत्त्व जाणून घ्या .
दत्तात्रेय जयंती 2023 तारीख | Datta Jayanti 2023
26 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाईल. या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात. संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.
Datta Jayanti 2023 Wishes | दत्त जयंतीच्या शुभेच्छा
दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय
सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी
लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा..!!
Datta Jayanti 2023 Wishes In Marathi
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व
आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक
मंगलमय शुभेच्छा!!
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार – दत्त जयंतीच्या शुभेच्छा!
भाव भक्ती ठेऊनी अंतःकरणी, लीन सदा तुझेच चरणी अंतरीच्या माझ्या कर दूर ही व्यथा – जय गुरुनाथा
Datta Jayanti 2023 Wishes
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
दत्त जयंतीचा सुखकर आणि मंगलमय दिन आपणा सर्वांसाठी सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो !
त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,
त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर
होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,
गुरु माऊली चरणी माझा नमस्कार
दत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:
गुरुर साक्षात परम ब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नम:
श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट – दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Datta Jayanti 2023 Wishes In Marathi
दत्तगुरू म्हणावे की स्वामी, समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती
औदुंबर की कल्पतरू, दीन दुःखितांचा कैवारू
दत्त जयंतीच्या शुभेच्छा मराठीतून (Datta Jayanti Shubhechha In Marathi) खास तुमच्यासाठी. दत्त जयंती म्हटली की एक वेगळा उत्साह असतो. आपल्याकडे अनेक ठिकाणी दत्तांची मंदिरे आहेत आणि याठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी खास कार्यक्रमही करण्यात येतात. अशा दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा.
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!
ज्याच्या मनी गुरू विचार, तो नसे कधी लाचार
ज्याच्या अंगी गुरू भक्ती, त्याला नाही कशाचीही भीती – दत्तगुरू जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!
त्रिमूर्ती हा अवतार, दत्तरूपी साकार, त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर
होता साक्षात्कार घडतो चमत्कार, गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका – दत्त दिगंबर
काही मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय
आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय – दत्तगुरू दत्तगुरू श्रीदत्तगुरू
वाणी असे मधुर, बुद्धी असे सतेज
चित्त असे एकाग्र, सद्गुरू दर्शन – दत्त दिगंबर
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सकल पालनहारा..
भक्त वत्सल सुखकरा..
अनुसया पुत्रा..
ब्रह्मा विष्णु महेश्वरा..!! – दिगंबरा दिगंबरा
अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!!
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हेत
जन्ममरणाचा पुरलासे अंत – दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दत्त दिगंबर हे आपल्या सर्वांचे गुरुदैवत आहे. यावर्षी दत्त जयंतीला तुम्ही दत्त जयंती कोट्स (Datta Jayanti Quotes In Marathi) वापरून नक्की शुभेच्छा द्या! जय गुरुदेव दत्त!