दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा संदेश | Diwali Padwa Wishes In Marathi : दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. या दिवशी विवाहित दंपती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा सुद्धा करतात. ग्रामीण भागातील घरातील पशूंना विशेष गाई, बैल, म्हशी वगैरे यांना सजवून दिवाळीचे मिष्टान्न खायला देतात.
दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा संदेश | Diwali Padwa Wishes In Marathi
दिवाळी पाडव्या निमित्त शुभेच्छा संदेश | Diwali Padwa Wishes In Marathi
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Diwali Padwa Wishes In Marathi :
आला पाडवा,
चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- दिवाळीच्या शुभेच्या | Diwali Wishes In Marathi
- दिवाळीची संपूर्ण माहिती | Diwali Information 2023 Marathi
- धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
- धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Wishes In Marathi
- वसुबारस निमित्त शुभेच्या | Vasubaras Wishes In Marathi
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा शुभेच्छा!
दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Diwali Padwa Wishes In Marathi :
सगळा आनंद, सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा
सत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
आज बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.
Diwali Padwa Wishes In Marathi :
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास
तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात
या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य,
आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे,
लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर,
तुझा सहवास जन्मभर राहू दे
सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम
बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो
सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो
दुःखाची सावलीही तुझ्याजवळ न येवो
चेहरा तुझा कायम असाच हसरा राहो
आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि
देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
Diwali Padwa Wishes In Marathi :
दीपावली असा आहे सण,
जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा.
चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई,
तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा
आणि तुम्हा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
आज पवित्र पाडवा, काल झालेले लक्ष्मीचे आगमन
अशा मंगल समयी आपल्या मंगल भविष्याची पायाभरणी होवो
सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया
भिन्नविभिन्न असलो तरीही कायम एकत्रच राहूया
दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, होतो आनंदाचा वर्षाव
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने यश आणि आनंद मिळो सर्वांना
आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
Diwali Padwa Wishes In Marathi :
दिव्यांची आरास मनात वाढवी उल्हास,
अशा दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi
- भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi
- नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती | Narak Chaturdashi Wishes, Info
- Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी
प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो…
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
धनाचा होवो वर्षाव,
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृद्धी,
हीच देवाच्या चरणी प्रार्थना,
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!