Diwali Information 2023 Marathi | दिवाळीची संपूर्ण माहिती

Diwali Information Marathi | दिवाळीची संपूर्ण माहिती : दीपावली आणि दिवाळी हे हिंदू धार्मिक सण सर्वात मोठे मानले जातात आणि दरवर्षी सर्व भारतीय मोठ्या उत्साहाने साजरे करतात. प्रत्येक सणाची एक कथा असते जी प्रत्येक सहभागीला त्याचे महत्त्व स्पष्ट करते. (Diwali Information) दिवाळीला वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविला जातो. प्रकाशाचा सण अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. भारतात पाच दिवस चालणारा हा एकमेव कार्यक्रम आहे.

दिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information

भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. (Diwali Information) घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात. दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.

असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते. श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.

Diwali Information 2023 Marathi
Diwali Information 2023 Marathi

दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.

त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी “दिपोत्सव” म्हणून ओळखली जाते. (Diwali Information) या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. पारंपारिक रिती पद्धतीने आणि तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानल्या जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात.

दिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषनाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. (Diwali Information) सामान्य मानुसही यावेळी मनमोकळेपणे खरेदी करतो.

दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सन’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्क्रूत् मध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.

दिवाळी सणाचे दिवस

हा उत्सव फारच मनोरंजक असतो. (Diwali Information) लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात. घरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.

धनत्रयोदशी

दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी असते. या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने, चांदी तसेच धनाची देवी धन्वंतरीची पूजा करून अभिषेक करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी देवी धन्वंतरी दिवस असतो.

नरक चतुर्थी

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्थी हा दिवस छोटी दिवाळी म्हणून गणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात. (Diwali Information) महिला हातांवर मेंदी काढतात, दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो, मुलांना उपहार दिले जातात, त्यानंतर लक्ष्मीपूजन असते.

लक्ष्मीपूजन

या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरिती रिवाजात माता लक्ष्मी, श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या देवी देवतांना आमंत्रीत केले जाते. घरात नेहमी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या व तिजोऱ्या खुले ठेवले जातात. तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते.

पूजा रितीरिवाजाप्रमाणे पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनाच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणित केले जाते. गोड पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो. (Diwali Information) एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभकामना दिल्या जातात. या दिवशी व्यापारी व्यावसायिक आपल्या दुकानांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.

बलिप्रतिपदा – Balipratipada in Marathi

आपल्या भारतामध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदेस  बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस अनेक भागांमध्ये दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखला जातो. (Diwali Information) यादिवशी, बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना करतात.

मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. यादिवशी, खासकरून शेतकरी पहाटे स्नान करून,  डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. (Diwali Information) काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.

आपल्या भारत देशात शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. खरंतर, या शेणाला “शुभा” असे म्हणतात. (Diwali Information) असा हा लोककल्याणकारी राजा म्हणजेच बळीराजा ज्याच्या पूजनाचा हा दिवस खूप आनंदाने सगळीकडे साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीनुसार खरंतर याचदिवशी ‘विक्रम संवत’ देखील सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा या सणाला नववर्षाची सुरुवात मानतात आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.

व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या, कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी लिहायला सुरू होतात. परंतु, या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा केली जाते. (Diwali Information) व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. प्रत्येकाच्या घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. 

यामध्ये विशेष म्हणजे नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” असे म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी मुलीकडचे आपल्या जावयास आहेर करतात.

दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. शिवाय, गायी – बैलांना रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू ज्यांना पाठारे प्रभू असेही बोलवले जाते, (Diwali Information) अशा लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल पाळली जाते.

पाडवागोवर्धन पूजा

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. या दिवशी विवाहित दंपती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा सुद्धा करतात. ग्रामीण भागातील घरातील पशूंना विशेष गाई, बैल, म्हशी वगैरे यांना सजवून दिवाळीचे मिष्टान्न खायला देतात.

भाऊबीज

भाऊबीज
भाऊबीज

दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या अतुट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला दिव्यांच्या आरास मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्याच्या समृद्धी व भरभराटीचे शुभकामना करते. भाऊ बहिणीला छानसे उपहार देऊन खूष करतात व आपल्या नात्याला अधिक मधुर बनविण्याचा प्रयत्न करतात. (Diwali Information) हा दिवस रक्षाबंधनासारखा आहे. तसाच पवित्र मानला जातो.

दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे (Diwali Puja in Marathi)

दिवाळीत प्रत्येकजण देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करतो आणि आपणही रामाची पूजा केली पाहिजे. भगवान राम आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग –

पूजेचे साहित्य

लाकडी चौरंग, त्यावर टाकण्यासाठी लाल किंवा पिवळे वस्त्र, देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या मूर्ती किंवा प्रतिमा, कुकू, हळदी, चंदन, अक्षता, पान आणि सुपारी, कलश, त्यावर ठेवण्यासाठी नारळ, अगरबत्ती, दिव्यासाठी तूप, पितळी किंवा मातीचा दिवा, कापसाची वात, पंचामृत, गंगाजल, फुले, फळे, पाणी, आंब्याची पानं, कापूर, तांदूळ आणि गव्हाचे दाणे, दुर्वा, जानवे, अगरबत्ती, नवा झाडू, पैसे (नोटा आणि नाणी) आणि आरतीचे ताट.

आयोजन

  • पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून लाकडी चौरंग ठेवा.

पूजेचा विधी

  • लक्ष्मीपूजन करताना एका चौरंग घ्यावं. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन त्यात जरा गंगा जल मिसळून 80 टक्के पाण्याने भरुन घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे.
  • कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या.
  • आता देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी ठेवावी  आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप लावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. पूजा स्थळी केससुणीची पूजा करावी.
  • आता हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ऊँ महालक्ष्मयै नम: जप करु शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी.

किल्ल्याच्या प्रतिकृती

रत्नदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती
रत्नदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती

Diwali Information : दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात. दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.

फटाके

Diwali Information : दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते. लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.

जागतिक स्वरूप

Diwali Information : आपण जर जागतिक स्तरावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांकडे पाहिलं तर, आपल्या लक्षात येईल की दिवाळी या सणाला आता जागतिक स्वरूप प्राप्त होत चालले आहे. कारण, जगभरातले भारतीय लोक वेगवेगळ्या देशांतील आपापल्या शहरात दिवाळी सण खूप उत्साहाने आणि अनोख्या पद्धतीने साजरा करतात. 

त्यामुळे, अमेरिका येथे प्रसिध्द असलेल्या न्यू जर्सी या भागात भारतासारखी दुकाने आपल्याला सजवलेली आढळतात. खरंतर, जपान आणि चीन या देशांमध्ये आकर्षक असे दिवाळीच्या उत्साहामध्ये विशेष असणारे आकाशकंदील बनवले जातात, त्याचबरोबर, अन्य देशांमध्येही आकाश कंदिला सोबतच आकर्षक असे वेगवेगळ्या आकाराचे, सुंदर रंगांचे आणि सुरेख नक्षीचे दिवेही बनवले जातात. दिवाळीच्या दिवशी या देशांमध्ये आकाशकंदील आणि दिवे सगळीकडे लाऊन दिवाळी हा सण साजरा केला जातो. अशा रीतीने, आपल्या अनेक भारतीय सणांना जागतिक पातळीवर उच्च असा दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो.

अमावस्येची सुरुवात दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला सोमवारी 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत असेल. परिणामी उदयातिथीप्रमाणं 13 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणं अपेक्षित आहे. पण, लक्ष्मीपूजन सायंकाळी केलं जातं. त्यामुळं यंदाच्या वर्षी दिवाळी, लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरलाच करणं शुभ असेल. 

Deepawali 2023 Date : When is Diwali?

लक्ष्मी पूजन तिथी आणि मुहूर्त 2023

लक्मी पूजनाचा मुहूर्त – सायंकाळी 17.40 ते 19.36 पर्यंत 
शुभ काळ – 1 तास 55 मिनिटं 
प्रदोष काळ – सायंकाळी 17.29 पासून 20.07 पर्यंत 
वृषभ काळ – सायंकाळी 17.40 ते 19.36 पर्यंत 
महानिशीथ काळात लक्ष्मीपूजन – रात्री 23.39 ते 00.31 पर्यंत 
काळ – 52 मिनिटं 
सिंह काळ – मध्यरात्री 00.12 ते 2.30 

दिवाळीतील महत्त्वाचे दिवस 2023

9 नोव्हेंबर 2023 – वसुबारस 
10 नोव्हेंबर 2023 – धनत्रयोदशी 
11 नोव्हेंबर 2023 – या दिवशी दिवाळीतील कोणतीही तिथी नाही 
12 नोव्हेंबर 2023 – नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन (मराठी दिनदर्शिकेनुसार सायंकाळी 5.59  ते रात्री 8.33 पर्यंत)
13 नोव्हेंबर 2023 – सोमवती अमावस्या 
14 नोव्हेंबर 2023 – बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा 
15 नोव्हेंबर 2023 – भाऊबीज 

(वरील माहिती सर्वसामान्य गृहितकांवर आधारित आहे. आम्ही याची खातरजमा करत नाही. )

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

आम्हाला आशा आहे की हा दिवाळी / Diwali Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका…

Leave a Comment