Doctor Patient Jokes | डॉक्टर पेशेंट मराठी जोक्स
पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.
डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.
डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.
पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?
डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.
डॉक्टरांकडे एकजण येतो आणि आपला पाय दुखत असल्याचे सांगतो.
डॉक्टर त्याचा पाय बघतात तर तो निळा पडल्याच दिसतं.
डॉक्टर: अरे भाऊ, विष पसरलेलं दिसतंय. पाय कापावा लागेल.
डॉक्टर त्याचा पाय काढतात आणि त्याजागी नकली पाय लावतात.
त्या तरुणाचा नकली पायपण निळा पडतो. तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो.
डॉक्टर पाय पाहतात आणि म्हणतात, “अरेच्चा, आता कुठे खरा आजार माझ्या लक्षात आला.
तुझी जीन्स आहे ना, तिचा रंग जातो आहे.”
एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.
तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.
नवरा आता चार दिवसांपासून भुकेला त्या मुलाला शोधतोय.
एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते. तो दवाखान्यात जातो.
माणूस: डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?
डॉक्टर: हो येतात की. कशाला घालायचे आहेत?
माणूस: ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.
बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून
दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?
डॉक्टर : ५० वेळा.
बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?
डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या
आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.
एक आजोबा डॉक्टरकडे जातात.
त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.
डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.
आजोबा: डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?
डॉक्टर: हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.
आजोबा: अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.
मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा, वा, वा !!!
एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो. नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते. रुग्ण: अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला.
नर्स: काय तहान लागली आहे का?
रुग्ण: (वैतागून) नाही…गळा लिकेज आहे का ते बघायचंय.
पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर: काय ?
पेशंट: जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो…! काय करू?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा…
डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ….छातीत दुखत होत….
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या: हो.. पण १ च पेग बनवा….
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते.