मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita : या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत मैत्री कविता मराठी, मराठी मैत्री कविता, Maitri Marathi Kavita, Friendship Maitri Kavita, Maitri Kavita In Marathi इत्यादी.
मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
” मैत्री “अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..
एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..
एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..
एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..
एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..
आजही मला ते सर्व
आठवतयं जणू कालचं सारे
घडल्यासारखं |
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात
बसल्यासारखं ||
अजुनही मला आठवतंय
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत
बसायचो |
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो ||
फ़क्त मैत्री… ( मैत्री चारोळ्या )
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री……..
ती मैत्री
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री……
मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
मैंञीची वेल
एखादी मैंञीची वेल असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण त्या वेलीकडे पाहुणी .
मैंञीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी,
फक्त त्या वेलीला मैंञीची जान असावी.
उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .
फुलावी मैंञीची ही वेल माझ्या अंगणी ,
मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.
वाहुण मी त्या वेली सोबत जाईन
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
मैत्रीविना सारेच फिके
मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे
मित्र हा असतो
पहाट सोनेरी किरणांची
नवीन आशेची नवीन विचारांची
एका स्वतंत्र आयुष्याची
जन्म अडतो अशा मैत्री वाचून
गरज हि प्रत्येक जीवनाची
मित्र हा असतो असा एक झरा
असतो ज्याकडे मनातील वसा
त्यावाचून खिडकीतून परततो गंध
न घेता वारा प्रत्येक घटनेचा इतिहास
तो पाहुल टाका दाही दिशा खाचखलाग्यावारुनी
लोटांगण घाली निस्वार्थ मैत्री हीच
त्याची शिधा व्यक्त करण्या आपल्या
भावना नसे गरज शब्दाची अबोल
डोळ्यातूनही वाचे गरज आपल्या आयुष्याची…
मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
तुझी मैत्रि आहे
तुझी मैत्रि आहे म्हणुनच
जगण्याची जिद्द आहे
तुझ्या मैत्रितुन बाहेर पडले तर
लगेचच मरणाची हद्द आहे
तुझी मैत्रि आहे म्हणुनच
आयुष्याचा हा प्रवास आहे
तुझ्या मैत्रिशिवाय जगण्याचा
नुसताच भास आहे तुझी मैत्रि आहे
म्हणुनच तुझ्यासमोर दोन
अश्रू ढाळू शकते वेड्या
या जगात जगण्याच्या मर्यादा
मी पाळू शकते तुझी मैत्रि आहे….
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता
दिवा जग जळतं माझ्यावर कारण
माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा..
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं.
मैत्रीमध्ये जरुरी नाही
दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी
संवाद असता थेट.
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.
आपली पहिली भेट अशी
त्रिखंडात दुमदुमत राहील
आपल्या मैत्रीचा डंखा
अखेरपर्यंत घुमत राहील.
‘तुझ्या माझ्या’ “मैत्रीत” काय “गुपित” लपलंय
तुझ्या माझ्या “मैत्रीने” फक्त आपलेपण जपलंय
“नात्यांचे” स्नेह बंध कोण शोधत बसलंय
“जीवा” पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय..
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.
एक मित्र असावा तुमच्यासारखा
सतत हवाहवासा वाटणारा,
सतत बोलत राहावस वाटणारा
सतत स्वप्नात मस्ती करणारा.
मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन
आपल्या मैत्रीच त्याला पाणी घालीन
जगलं तर ठिक नाहीतर
मी वाळवंटाला सुद्धा आग लावीन.
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.
कळत नकळतच ते मित्र होतात,
कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळं काही कळते.
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.
मराठी मैत्री कविता | Maitri Marathi Kavita
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो…