Rajaram Maharaj Jayanti

छत्रपती राजाराम महाराज जयंती | Ch. Rajaram Maharaj Jayanti

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

Chhatrapati Rajaram Maharaj Jayanti : Chhatrapati Rajaram Maharaj, Chhatrapati Rajaram Maharaj Jayanti Quotes In Marathi

Rajaram Maharaj Jayanti
Rajaram Maharaj Jayanti

Chhatrapati Rajaram Maharaj Jayanti Quotes In Marathi

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल ११ वर्ष स्वराज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारे हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !🙏🙏🙏

स्वराज्याचे छत्रपती व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांची आज जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

राजाराम मुघलशाही पालथी करेल’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची भविष्यवाणी सार्थ ठरवत, अत्यंत पराक्रमाने स्वराज्याचे संरक्षण व संवर्धन करणारे निर्भीड, मुत्सद्दी, पराक्रमी, प्रजावत्सल, रणनिती धुरंधर, लढवय्ये हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा… 💐🙏🚩

स्वराज्य जिंकून घेण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळवणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

पालथे निपजले दिल्लीची पातशाही पालथी घातली .. !! शिवबोल सार्थ केले शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आपल्या राजकीय मुत्सद्दीपणा ने आणि युद्धकौशल्यातील व्यवहार चातुर्याने स्वराज्याची धुरा सलग ११ वर्षे सांभाळणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek
बाळासाहेब ठाकरे जयंती स्टेटस | Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi
Chhatrapati Sambhaji Maharaj Status | छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी
Sambhaji Maharaj Jayanti Wishesh – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा

Chhatrapati Rajaram Maharaj Information In Marathi

छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र आणि मराठेशाहीतील तिसरे छत्रपती. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवपत्नी सोयराबाईंच्या पोटी राजगडावर झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रसंगामुळे संपूर्ण मराठी स्वराज्य हादरले.

कठीण प्रसंगी सारासार बुद्धीने विचार करू शकतील असे काही लोक शिवाजी महाराजांनी अगोदरच मिळवून ठेवले होते. यामध्ये रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, प्रल्हाद निराजी इत्यादींचा समावेश होता. या सर्व मंडळींनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला (1689).

मोगलांच्या आक्रमणामुळे राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला जावे लागले. संभाजी महाराजांच्या पाडावाने औरंगजेबाला आनंद झाला असला तरी, राजाराम महाराजांना कैद न झाल्याची गोष्ट त्याला खटकत होती. त्याने दक्षिणेत उतरून आदिलशाही (1686) आणि कुतुबशाहीचा (1687) यांचा पाडाव केला. या प्रसंगानंतर तो विजापूरकडे मोगल सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी निघून गेला.

तेथून पुढे औरंगजेबाने ब्रह्मपुरीला येऊन मराठ्यांचे गडकोट घेण्याची मोहीम सुरू केली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. यावेळी त्यांचे वय अवघे 19 वर्षे होते.

राजाराम महाराज रायगडावरून निघून नोव्हेंबर 1689 च्या पहिल्या आठवड्यात जिंजीला पोहोचले. मराठ्यांनी जिंजीलाच राजधानी केली. जिंजीला तीन लक्ष होनांचा खजिना होता. तो मराठ्यांनी ताब्यात घेतला. महाराजांनी जिंजीला राजदरबार भरविला. संताजी आणि धनाजी यांची सेनापतीपदी नियुक्ती केली.

शंकराजी नारायण, नेमाजी शिंदे, हनुमंतराव घोरपडे अशा विश्वासू माणसांना बरोबर घेऊन त्यांनी जिंजीवरून राज्यकारभारास सुरुवात केली. पुढे जिंजीला वेढा पडला, तिथून निघून ते विशाळगडावर आले आणि भविष्यातील दिशा ठरवली. अतिशय अवघड परिस्थितीत स्वराज्याची धुरा सांभाळणार्‍या छत्रपती राजाराम महाराज यांचे २ मार्च १७०० रोजी निधन झाले.

Leave a Comment