Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये

Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये

Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये : रिमझिम पाऊस मराठी कविता पहिला पाऊस मराठी कविता हा पिहीला पाउस मनाला सुखाऊन गेला स्वर्गात कदाचित असाच आनंद मिळत असेल एकदा पहिल्या पावसात भिजून बघा…  

Pavsachi Kavita - पावसाची कविता मराठीमध्ये
Pavsachi Kavita - पावसाची कविता मराठीमध्ये 2

Pavsachi Kavita – पावसाची कविता मराठीमध्ये

रिम झिम रिम झिम पाऊस धारा
बरसू लागल्या
स्वागतास वारा मातीचा सुगंध घेऊन दरवळू लागला
पाऊस आला पाऊस आला
सळसळ सळसळ पाने करती
सुखावले सगळे प्राणी पक्षी
नदी नाले ओथंबून वाहती
बहिणी बहिणी गळा भेटती
डोंगरावरती हिरवळ पसरली
नव नवीन फुले उमलली
आनंदाचे सूर उमटले
धरतीवरती स्वर्ग प्रकटले
पावसाची ही किमया न्यारी
-अभिजित हजारे.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

बरसणाऱ्या सरी

आकाशातून या सरी बरसतात
सगळीकडे
पण अजूनही मी कोरडीच आहे
बऱ्याच वर्षांपासून
काळेशार दूत तुला घेऊन येतात
दरवर्षी पण तु बरसत नाहीस
कदाचित तुला माझ्या जखमा (मातीच्या भेगा )
आवडत नसतील
कुरूप वाटत असेल मी
हिरव्या पालवीचे अलंकार नाहीत माझ्यावर
तु आलाच नाहीस तर या जखमा वाढतात दरवर्षी
मला खात्री आहे या वर्षी तु नक्की येशील
मग मी नेहमी प्रमाणे तुझ्या स्वागतासाठी येईल
हिरवा शालू नेसून तुझ्यासाठी
-अभिजित हजारे.

Leave a Comment