Rajnikant Jokes | रजनीकांत जोक्स – भाग १
रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता.
रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.
संता-बंता आत्महत्या करणार आहेत.
रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही,
अशी त्यांची तक्रार आहे.
रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली..
शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.
रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले..
त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.
एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?..
ट्रॅफिक हवालदार..
सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?
मिशन इम्पॉसिबल हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता..
रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!
सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती..
जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..
एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला..
रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ढिशक्यांव!!!!
रजनीकांत कॉलेजात शिकत होता
तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
Rani Lakshmibai Info Marathi | झाशीची राणी लक्ष्मीबाई
Datta Jayanti 2023 Wishes | दत्त जयंतीच्या शुभेच्छा
100+ दिवाळी पाडवा उखाणे | Diwali Padwa Ukhane
Friendship Day Wishes 2023 | जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Bakri Eid Wishes In Marathi | बकरी ईद शुभेच्छा 2023