Vasundhara Din Quotes In Marathi : Vasundhara Din Marathi (Earth Day Quotes In Marathi) जागतिक वसुंधरा दिन माहिती व कोटस्
Vasundhara Din (Earth Day) Information | जागतिक वसुंधरा दिन माहिती
पहिल्या Earth Day ची सुरुवात
वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे पर्यावरण रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले.
आपण काय करू शकतो
तुम्हाला पृथ्वीसाठी जे जे चांगले करता येईल, ते ते सारे करा, सारे काही मजेत करा. लोकांना भेटा. त्यासाठी वसुंधरा दिन कधी येईल, याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच (Earth Day) असतो. आपल्या भवितव्याची अधिक चांगली बांधणी करण्यासाठी संपूर्ण वर्षभरच सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी वचनबद्ध राहिले पाहिजे.
वसुंधरा दिनाच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी अनंत संधी आहेत. स्वयंसेवक बना. महोत्सवांत सहभागी व्हा. तुमच्या घरांच्या छपरांवर सौर पॅनेल्सची उभारणी करा. तुमच्या समाजात कार्यक्रमाची आखणी करा. आपल्या समाजासाठी सार्वजनिक बगीचा तयार करण्याचा कार्यक्रम हाती घ्या. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीशी आपल्या पर्यावरणविषयक प्राधान्यक्रमांविषयी संवाद साधा.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
जागतिक वन दिवस | World Forest Day Quotes In Marathi |
जागतिक जलदिनानिमित घोषवाक्ये | World Water Day Quotes In Marathi 2024 |
टपाल दिन | Tapal Din | World Post Day Essay In Marathi |
Vasundhara Din Quotes In Marathi | जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा
जर तुम्ही पृथ्वी नष्ट केली तर,
सर्व जीवन नष्ट होईल.
म्हणून पृथ्वीला वाचवा.
हवा आणि पाणी या जंगल व पशूपक्षी यांना वाचवण्यासाठीच्या योजना खरंतर मानवाला वाचवण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत.
प्रयत्न करा की, जेव्हा तुम्ही आलात त्याच्या तुलनेत जाताना पृथ्वीला एक उत्तम स्थानाच्या रूपात सोडून जा.
ईश्वराचा शोध घेण्याची गरज नाही कारण तो पशू-पक्षी आणि पर्यावरणात आहे. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा
श्वास होत आहेत कमी चला झाडे लावूया मिळूनी.
गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान.
जर तुम्हाला सुखी जीवन हवे असेल तर,
पृथ्वीला वाचवा.
डोंगरांना खोदत आहेत संतुलन बिघडत आहे, पण लक्षात घ्या यात नुकसान तुमचंच आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.
प्रत्येकाला हे सांगणं आहे झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा.
पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे,
जेथे जीवन आहे,
पृथ्वीला वाचवा.
पृथ्वी नाहीतर जगण्याची संधी नाही, जागतिक वसुंधरा दिन.
पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा हॅपी अर्थ डे.
पृथ्वी फुलांमध्ये हसते हॅपी अर्थ डे.