होळीच्या मराठी शुभेच्या | Holi Wishes In Marathi 2024 : happy holi wish in marathi, happy holi wishes in marathi, holi wishes marathi, holi quotes in marathi, holi shubhechha marathi
होळीच्या मराठी शुभेच्या | Holi Wishes In Marathi 2024
2024 मध्ये 25 मार्च रोजी रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. मित्रांनो, होळी हा फक्त एकमेकांना रंग लावण्याचा सण नसून, तर तो प्रेम, सलोखा आणि आपुलकिंच्या भावनांचा सण आहे … या दिवशी एकमेकांना रंग लावून आपण सर्व जुन्या वाईट गोष्टी विसरून नवीन रीतीने आपले आयुष्य सुरू करतो.
Holi Wishes In Marathi 2024
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वालेत वाईटाचा समुळ नाश होवो!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला अहंकार, अपेक्षा आणि सर्वकाही
होळीच्या आगीत जाळून घ्या आणि
उत्सवाचा आनंद घ्या. होळीच्या शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
होळी रे होळी पुरणाची पोळी
आनंद घेऊन येऊन दे यंदाची होळी
होळीच्या शुभेच्छा!
होळीच्या उठल्या ज्वाळा
त्यातून बाहेर पडल्या दु:खाच्या झळा
होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!
भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊😊
रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 😊
Holi Wishes In Marathi 2024
वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत.
जुनी पानॆ गळून
नवी पालवी मिरवीत आहॆत,
रंग-बेरंगी रंगाची
उधळण करीत आहॆत,
जुनॆ नकॊ तॆ हॊळीत टाकून तुम्ही ही,
रंगा-रंगार-रंगुन जा
!!हॊळीच्या हार्दिक शुभॆच्छा!!
Happy Holi Wish In Marathi
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
रंगाचा सण हा आला,
आनंद, सुख शांती लाभो तुम्हाला
होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
न जाणता जात नि भाषा उधळूया रंग,
चढू दे प्रेमाची नशा मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
थंड रंग स्पर्श
मनी नव हर्ष
अखंड रंग बंध
जगी सर्वधुंद
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
होळीची संपूर्ण माहिती | Holi Festival Information In Marathi |
धुलीवंदनाला खास शुभेच्छा | Dhulivandan Wishes In Marathi |
होळीच्या या शुभ प्रसंगी,
मला आशा आहे की
तुमच्या जीवनाचा कॅनव्हास
आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो.
“- होळीच्या शुभेच्छा! “
Holi Wishes In Marathi 2024
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi Wishes In Marathi 2024
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्याचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्साहाचा, सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा!
आम्रतरूवर कोकीळ गाई
दुःख सारं सरून जाई
नवरंगांची उधलण होई
होळी जीवन गाणे गाई
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 😊
झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
😊 होळीच्या हरित शुभेच्छा 😊
Holi Wishes In Marathi 2024
टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख,
अनारोग्याचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi Shubhechha Marathi
होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
ईडापीडा दुःख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाईट गुणांची करून होळी
सद्गुणांची ज्योत अंतरी लावू
भेदभाव ते सारे विसरून
आपुल्या नात्यांचा रंग खुलवू
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi Wishes In Marathi 2024
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी,
रंगामध्ये रंगून जाण्यासाठी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको मराठी विनोद – भाग १
- Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको विनोद – भाग २
- Navra Bayko Jokes In Marathi Sharechat – भाग 3
- Non Veg Navra Bayko Jokes Marathi – भाग 4
- Jokes In Marathi Navra Bayko – भाग ५
एकत्र येऊन साजरी करु होळी,
दु:खाला जाळू
दु:खाची चादर हटवण्यासाठी आली होळी..
चला साजरी करु यंदाची होळी
प्रेमात होऊ दे वाढ..
होळीच्या या शुभदिवशी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
भेटीलागी आले।
रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे।
रंग तुझा।।
वदलो बा माझी ।
पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात।
मिसळतो।।
😊 होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊
Holi Wishes In Marathi 2024
फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
😀🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂😀
तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!
जीवन एक होळी आहे
आयुष्य जळते सुविचाराचां गंध, कु विचारांचा धुर असतो
जीवनाची होळी एकदाच पेटते व एकदाच विझते
Holi Wishes In Marathi 2024
परमेश्वराला प्रार्थना आहे की
आजची ही होळी तुमच्या आयुष्यात
आनंदाचे रंग भरो.
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या पवित्र अग्नीत निराशा,
दारिद्र्य आणि आळसाचे दहन होवो.
हीच परमेश्वराला प्रार्थना.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi Captions Marathi
मुक्त रंगांची उधळण करत आली होळी
विशेष मजा ती खायला मिळेल पुरणपोळी
दुख, संकट निराशा समेत सर्व काही जाळी
सर्वांना हॅप्पी होळी
होळी होळी निसर्गातील पानगळ जाळण्यासाठी
होळी मनातील वाईट विचार जाळण्यासाठी
असा हा सण मनातील मरगळ घालविण्यासाठी
मनाला नवचेतना देण्यासाठी
होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा
विषमतेची करूया होळी
समानतेचा मळवट भरुया कपाळी
ठरेल खचित ती होळी आगळी
जुने हेवेदावे जुनी भांडणे होळीमध्ये टाकूया,
विसरून जाऊ द्वेष आणि सारे नातेसंबंध राखुया
Happy Holi to Everyone
Holi Wishes In Marathi 2024
होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂🙂
“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
😄 होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 😄
होळी राखू मांगल्य होळी सणाचे
नको द्वेष आकस नि अहंकार
नैवेद्य दाखवुनी पुरणपोळीचा
ऐकू अवनीचे मधुर हुंकार
Holi Wishes In Marathi 2024
प्रार्थना आहे की आपणास आणि
आपल्या कुटुंबास ही होळी
आनंदाची यशाची आणि समृद्धीची जावो.
रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!