Narali Purnima Information | नारळी पौर्णिमा माहिती

Narali Purnima Information | नारळी पौर्णिमा माहिती

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी सणवार

Narali Purnima Information : नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा बद्दल, नागपंचमी नंतर श्रावणात येणारा दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा हा सण विशेषतः समुद्र किनारी राहणारे बांधव व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे.

पावसाळ्यात समुद्र हा वादळ व वाऱ्यामुळे प्रचंड खवळलेला असतो त्या मुळे कोळी बांधव या दरम्यान समुद्रात जात नाही, या काळामध्ये बोटी व जहाजांची वर्दळ बंद असते.

या वादळी व लाटा मुळे कोणालाही हानी पोहचू नये , जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून कोळी बांधव , समुद्र शांत होण्यासाठी या दिवशी समुद्राची पूजा करतात व समुद्रकिनाऱ्यावर नारळाचेच उत्पन्न मोठे असते म्हणून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

हि पूजा झाल्यानंतर पुन्हा मासे पकडण्यास व जहाज द्वारे होणाऱ्या व्यवहारास सुरवात होते.

मित्रानो समुद्र किनाऱ्यावरील कोळी बांधव याच जीवन हे सागराशी निगडीत असते, कोळी बांधव आपला उदरनिर्वाह साठी मासेमारीचा व्यवसाय करत असतात त्यामुळे समुद्राबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो.

श्रावणातील पौर्णिमेला भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या विधी केल्या जाता, जसे कि भारतातील काही भागा मध्ये या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. म्हणून या दिवसाला राखी पौर्णिमा किंवा राखी पूनम असे सुद्धा म्हटले जाते.

जाणून घेऊया नारळी पौर्णिमेच्या पाच खास गोष्टी ज्या खूप कमी जणांना माहिती आहे.

  1. हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण पौर्णिमेला दक्षिण भारतातील पश्चिम घाटासह सर्व सागरी भागात नारळ पौर्णिमा म्हणतात.
  2. नारळी पौर्णिमा हा विशेषत: सर्व कोळी बांधवांचा सण आहे. मच्छिमार देखील या दिवसापासून भगवान इंद्र आणि वरुणाची पूजा करून मासेमारीला सुरुवात करतात.
  3. या दिवशी पावसाची देवता इंद्र आणि समुद्राची देवता वरुण यांची पूजा केली जाते. पूजेदरम्यान समुद्रकिनारी त्याला नारळाची पाने विधिवत अर्पण केली जातात. म्हणजे समुद्रात नारळ टाकले जातात (Narali Purnima story in Marathi) जेणेकरून महासागर देव आपले सर्व प्रकारे रक्षण करतो. त्यामुळे या राखी पौर्णिमेला तिथे नारळी पौर्णिमा असेही म्हणतात.
  4. समुद्राला अर्पण करण्यापूर्वी नारळ पिवळ्या कापडाने आणि पानांनी सजवला जातो आणि नंतर त्याची मिरवणूक काढली जाते. नंतर नारळाची कुंडी समुद्राकडे ठेवून अर्चुनाची विधिवत पूजा करून मंत्रोच्चार करून अर्पण केले जाते. यानंतर धूप आणि दिवा लावला जातो. नारळ अर्पण करताना ‘हे वरुणदेव, तुझ्या उग्र रूपापासून आमचे रक्षण कर आणि तुझा आशीर्वाद घे’ अशी प्रार्थना करतो.
  5. दक्षिण भारतात समाजातील प्रत्येक वर्ग आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करतो. या दिवशी जानवेपरिधान करणारे त्यांचा जानवे बदलतात

Leave a Comment