Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४

marathi prem kavita, prem kavita in marathi, sad prem kavita in marathi, ektarfi prem kavita in marathi

Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४
Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४

Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह ४

💘 आठवणीच्या सागरातमासे कधिच पोहत नाही अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही, कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही.. … अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .पण नशिबाचे चक्र थांबत नाही आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

💘 आठवणीच्या हिंदोळ्यावर तुझे माझे भेटणे एकांती पावूल वाटेवर तुझ्या आठवणीतच माझे चालणे

💘 आठवणीत कधी जेव्हा मन वेड हरवते कोसळणाऱ्या पावसात मग आसवांना लावपते लपलेच प्रेम आणि न विसरलेल्या आठवणी ढगालेल तेच वातावर पण कोसळत नाहीत आता पुन्हा त्याच टपोर्या थेंबाच्यासरी वाहत राहता आता फक्त त्याच वेड्या आठवणीच्या लहरी

💘 आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !

💘 आधीच नाक तुझं एवढे एवढे, त्यावर रागाचे ऒझे केवढे. नजर तर अशी करारी, कि काळजाला नुसते जखमांचे धडे

💘 आन्तरीचा भावन्नाना शब्दाची गरज नसते. निशब्द नजरेला ओळखण्याचे सामर्थ्य मात्र लागते…….

💘 आपण घालवलेला एकही क्षण विसरायला सांगू नकोस …… तुला विसरनारे असतिलही त्यात मला मोजू नकोस !!!”

💘 आपली पहीली भेट.. नवी ओळख.. एक सुगंध मनात ठेऊन गेली. तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण, तरी एक बंध मनात ठेऊन गेली.

💘 आपल्याला प्रेम करता येते कोणताच तेढ न ठेवता मग आपण ते व्यक्त का करत नाही कोणतेच आढेवेढे न घेता ?

💘 आभाळ बरसताना सरळ दार लावून घ्यावं नाहीतर स्वत:ला दिशाहीन जाऊ द्यावं

💘 आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.

💘 आयुष्यभर ह्रदयाची, बनून राह राणी… तू ह्रदयात असता , हवं काय आणि…

💘 आयुष्यात झालेली जखम, कधितरी भुलवावी लागेल…… तुलाही आता, आयुष्याची नवीन सुरुआत करावी लागेल…..

💘 आयुष्यात प्रेम तसं , कमीच मिळालं… म्हणूनच प्रेम फार , जवळून कळालं…

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

💘 आयुष्यात माणसाला, बरंच काही मिळतं, बरंच काही हरवतं, जेंव्हा प्रेम होतं.

💘 आयुष्यातील सारे दुःख या डोळ्यांसमोर फिके आहे कारण आता नजरेसमोर तुझ्या आठवणीचेच धुके आहे

💘 आवडलं कुणी तर वेड होऊन जावं झपाटल्यासारखं प्रेम करावं बेधुंद होऊन तिच्यावर मरावं फुलासारखं तिला जपावं तीच सार दुखः ओंजळीत घ्यावं तिची ढाल बनून आयुष्य जगावं फक्त प्रेमासाठीच जगण होऊन जावं आपल्या प्रीत गंधाने तिला फुलवावं तिला वेड लागेल इतकं प्रेम करावं प्रेमानेच तिचही मन जिंकाव

💘 आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा, थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा, क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा, तो अनअमोल आनंद होता आमच्या प्रेमाचा.

💘 आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे, काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात …. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात ………. ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात

💘 आसवांची फुलेच दिलीस मला तु मौन राखिले तरी का डोळ्यात तुज्या सदा प्रश्नभाव राजसा प्रीत माजी हि खरी

💘 आहेस तरी तू कोण? काळजाचा प्रत्येक ठोकाही तुझेच नाव सांगून जातो, तुझ्या आठवणीत दिवस संपून जातो, ओठांपर्यंत येते तुझे नाव, स्वप्नांच् याच जगात राहू दे मला असे तू परत परत सांगून जातो

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

💘 इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस.. दूर आपण झालो कधीचे..प्लीज़, आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेक अप तरीही,डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.. खरेच सांगू का तुला,माझ्या मनात तू आत राहू नकोस! यायचे आहे तर समोर ये…होऊ दे खरीखुरी भेट ! वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे….असे छान सरप्राइज स्ट्रेट…!!!**

💘 इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण.. कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल

💘 उडोणी एक फुलपाखरु, तुझंपाशी आले … तूही एक फुल, बहुदा त्यालाही कळाले …

💘 उभा मी शांत आज , तूझ्याकडे पाहत… समोर माझ्या एक फुल , नुकतच होतं फुलत…

💘 ऋतू बदलत जातात दिवस उजाडतो,मावळ्तो सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती बदलत नाहीत ती फ़क्त माणसा माणसांमधली अनमोल नाती…… प्रेमाची

💘 एक क्षण तूझ्या सहवासात असलेला एक क्षण तुझ्या विरहात असलेला एक क्षण तुझ्या प्रतिक्षेत असलेला एक क्षण तुझ्या आठवणीने फुललेला एक क्षण तुझ्याबरोबर हसलेला माझ्या मनात मात्र खोलवर ठासलेला असा माझा एक क्षण तुझ्याचसाठी जगलेला जनु चंदनाप्रमाणे

💘 एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.आणि, आयुष्य लागते, त्याला विसरण्यासाठी

Leave a Comment