Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता - संग्रह ३

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह ३

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी प्रेम कविता

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह ३ : marathi prem kavita, prem kavita in marathi, sad prem kavita in marathi, ektarfi prem kavita in marathi

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता - संग्रह ३
Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता - संग्रह ३ 2

Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह ३

💘 आजच कदाचित तुझ्या नसण्याचे कारण मला कळले……….
म्हणूनच गणित जीवनाचे आज क्षितीजाला बघून कळले….

💘 आजही मन जागत होते तुझ्या येण्याच्या आशेवर
आणि डोळे लागुन राहिले होते तुझ्या येण्याच्या वाटेवर

💘 आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील तेव्हा तुला मी दिसेन…
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन…
तेव्हा तुला माझे शब्द पटतील तुझ्याही नजरेत तेव्हा…
माझ्यासाठी अश्रू दाटतील…. माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील कारण
तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ओठ तेव्हा माझे नसतील…

💘 आठवणी तर नेहमी पाझरतात
कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
अस वाटत कोणीतरी साद घालतय
आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून

💘 आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी …मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

💘 आठवणी येतात….! आठवणी बोलतात…..!
आठवणी हसवतात……! आठवणी रडवतात…….!
काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात……!
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात…

💘 आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारण मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.

💘 आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.

💘 आठवणींच्या मागे धावलो कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना, परतायचं राहुन जातं.

💘 आठवणींतल्या आठवणींना हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी मंद गालातल्या गालात हसायचं असतं.

💘 आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत,
तुला ईतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन,
खोटे हासु आणायचे तरी कसे?

Leave a Comment