Chhatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज भाषण – Shivaji Maharaj Speech In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी भाषण, थोर व्यक्तींची माहिती

Shivaji Maharaj Speech In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi – या पोस्टमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठीत भाषण वाचायला मिळेल. हे भाषण अत्यंत उत्कृष्ट आहे. तुम्ही या (Chhatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi) भाषणाचा वाचन करून, शिवजयंती आणि विविध स्पर्धांमध्ये, कार्यक्रमात भाषण करू शकता.

महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये अराजकता माजली होती…

महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये ज्यावेळी अराजकता माजली होती. माणसे गुलामासारखे जीवन जगत होती. कुणीही यावे आमच्यावरती आक्रमण करावे. अशी आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती होती. या कलाखंडामध्ये परकीय सत्तेच्या विरुद्ध बंड करणाऱ्या लोकांची संख्या हातावरच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांची होती. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये विखुरलेल्या मावळ्यांना एकसंध करणार नाही, तोपर्यंत बादशाहीचा बीमोड होणार नाही. हे ज्या महापुरुषाने (Shivaji Maharaj Speech In Marathi) ओळखले, रयतेच बहुजनांचे राज्य ज्या महापुरुषाने आपल्या मन, मनगटाच्या जोरावरती उभे केले स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये महाराष्ट्र धर्म मोठा करून शिवराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच महापुरुषाचे नाव आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावरती १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी झाला. वडील शहाजीराजे भोसले एक कर्तबगार मराठे सरदार म्हणून कार्य करत होते. अशा या पवित्र माता-पित्यांच्या पोटी सुपुत्र म्हणून छत्रपती शिवाजीराजे जन्मास आले. महाराजांचा जन्म झाला. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये १६३० साली दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता. माणसांना मूलभूत गरजा पूर्ण करणेसुद्धा बिकट होऊन बसले होते , असे वास्तववादी चित्र महाराष्ट्राचे होते. (Shivaji Maharaj Speech In Marathi)

माँसाहेब जिजाऊ यांच्या सानिध्यात असणारे महाराज प्राचीन कथा, साहस गोष्टी, पराक्रमांच्या गाथा याचे योग्य संस्कार हे महाराजांना त्यांच्या गुरुवर्या म्हणून त्यांना देण्याचे कार्य राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केले. बंगळूरच्या राजवाड्यामध्ये असताना महाराजांना मातोश्रींनी जिजाऊंनी संस्काराचे धडे दिले शिवरायांना सांगितले शिवबा तुम्हाला या स्वराज्यातल्या महिला, आबालवृद्ध, निराधार यांना साथ द्यायची त्यांचे रक्षणसुद्धा तुम्हालाच करायचे हे संस्कार माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना दिले.

शिवबा बाळराजे पुण्यामध्ये आले

६ वर्षांचे असताना शिवबा बाळराजे पुण्यामध्ये आले. पुण्याच्या लाल महालात राहू लागले अवती भोवतीच्या व्यायामाच्या कसरतींबरोबर बौद्धिक विचारांची सांगड घालून रयतेचे राज्य निर्माण करावे हीच भूमिका महाराजाच्या मनामध्ये होती. महाराजांनी रोहिडेश्वरच्या मंदिरामध्ये आपल्या निवडक सहकाऱ्याच्या समवेत हिंदवी स्वराज्य (Shivaji Maharaj Speech In Marathi) स्थापण्याची शपथ घेतली. हे राज्य निर्माण व्हावे ते सर्वांचे व्हावे हीच खऱ्या अर्थाने महाराजांची इच्छा होती. न स्वराज्य निर्मितीची स्थापना करत असताना महाराजांच्या समोर अनंत अडचणी उभ्या राहिल्या. हिंदुस्थानमध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बादशाहीराज्य करीत होते. या देशामध्ये मंदिरांची नासधूस होत होती.

धर्मांतराचे प्रमाण वाढत होते. परकीयांइतके, स्वकीयांकडूनही इथल्या जनतेचे शोषण होत होते. माणसाला गुलामासारखी वागणूक मिळत होती. महिलांना हीनतेची वागणूक मिळत होती. याच कालखंडामध्ये रयतेला आपलंसं वाटणारं राज्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे. हे महाराजांनी ओळखून मनगटाला मेंदूची शक्तीला युक्‍तीची जोड देऊन हातामध्ये तलवर घेऊन निवडक मावळ्यांच्या समवेत तोरणा गड जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. परकीय सत्तेचा पाडाव करायचा असेल तर नुसते युद्ध करून प्रश्‍न सुटणार नाही. प्रसंगी तह करावा लागेल. स्वराज्यातल्या फितुरीचा शोध सुद्धा घेतला पाहिजे म्हणून ‘ पहिल्यांदा जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पाडाव केला. प्रतापगड ताब्यात घेतला आणि प्रतापगडाचे विस्तारीकरण केले.

Chhatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Speech In Marathi

गनिमी कावा पद्धतीने शिवशाहीचा विस्तार

महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वत:चे पायदळ, घोडदळ हे सक्षम केले व यातून स्वराज्यांच्या बांधणीसाठी परकीय सत्तेच्या विनाशासाठी अत्याधुनिक पद्धतीने बांधणी केली. शत्रूचा शंत्रूतो आपला मित्र हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवली. गनिमी कावा पद्धतीने शिवशाहीचा विस्तार केला. प्रतापगडाच्या पायथ्याला १६५९ साली जेव्हा अफझलखान चालून आला त्यावेळी महाराजांनी अफझल खानासारख्या शत्रूचा बीमोड केला.

पण त्याचे दफन करण्यासाठी मात्र प्रतापगडाच्या पायथ्याला त्यांच्या धार्मिक पद्धतीने दफन करण्यास जागा दिली. लढाईतल्या शत्रूलासुद्धा माणुसकीच्या नात्यानं त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सन्मान राखणारा व दफनविधीस मदत करणारा असे जगातील हे एक मूर्तिमंत व दुर्मिळ उदाहरण होय.

आग्र्याची भेट

महाराज ज्यावेळी आग्र्याच्या भेटीसाठी गेले. त्यावेळी महाराजांचा अपमान करण्यात आला. महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. बाळराजे संभाजी व महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. जगाच्या इतिहासामध्ये शत्रूच्या हातावरती तुरी देऊन जाणारे हजारो राजे पाहायला मिळाले पण शत्रूच्या हातावरती मिठाई देऊन पलायन करणारे महाराज हे एकमेव राजे होते.

महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना सर्व समावेशक मंत्रिमंडळ निर्माण केले होते. सर्व जाती धर्मातील सर्वसमावेशक मंत्रिमंडळ निर्माण केले होते. सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग करून घेतला होता. महाराजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे आजही आदर्श मंत्रिमंडळ म्हणून पाहिलं जातं. दक्षिणेत, उत्तरेत आपल्या साम्राज्याचा विस्तार करत असताना मोंगली संकटांना सामोरे जाऊन, शाविस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग यासारख्यांचा योग्य बंदोबस्त केला.

रायगडावरती राज्याभिषेक

सर्वसामान्य स्यतेचे राज्य निर्माण व्हावे यासाठी महाराजांनी ६ जून १६६४ रोजी रायगडावरती राज्याभिषेक केला. रयतेला हक्काचा राजा म्हणून आपण जनतेस कटिबद्ध आहोत हे पटवून दिले. १६६४ साली नाविक दल आणि समुद्रामध्ये असणाऱ्या किल्ल्यांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले. स्वराज्य निर्मितीसाठी व स्वराज्याच्या उभारणीसाठी सुरतेवरती हल्ला चढवला व यातून स्वराज्याच्या हितासाठी सुरतेवरती हल्ल्यातून मिळालेल्या खजिन्याचा उपयोग केला. (Shivaji Maharaj Speech In Marathi)

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

मावळे

स्वराज्यामध्ये महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले. ‘महाराज जन्माला नाभिक समाजात आलो म्हणून काय झालं. मरताना शिवाजी भोसले म्हणून मरायचं भाग्य मला मिळत असेल तर शंभर वेळा मरायला तयार आहे’ असं म्हणणारा शिवा काशीद.

“महाराज तुम्ही पोहोचल्यानंतर येणाऱ्या तोफेच्या आवाजापर्यंत मी असंच लढत राहीन’

असं म्हणणारा बाजीप्रभूदेशपांडे, (Shivaji Maharaj Speech In Marathi) आधी लग्न कोंढाण्याचं … हे पहाडी आवाजात ठणकावून सांगणारा तानाजी मालुसरे, मदाजी म्हैतर, इंदोलकर यांसारखे हजारो मावळे महाराजांनी निर्माण केले. स्वराज्यातल्या प्रत्येक गोष्टींचे मोल जाणणारा गवताच्या काडीलासुद्धा लाखमोलाची किंमत देहणारा विज्ञानवादी राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. शत्रूंच्या सुनेचासुद्धा सन्मान करून तिच्या घरी सुखरूप पोहोचवणारा असा हा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला जातो.

महान राजांचे निधन

अशा या महान राजांचे निधन १६८० साली झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना ५० वर्षांचे आयुष्य लाभले. ५० वर्षांमध्ये ३५० किल्ले (जवळपास) जिंकणारा जे राजे आहे ते जनतेचे आहे असे मानणारा, दुष्काळाच्या कालखंडात शेतसारा माफ करणारा, ओसाड माळरांनावरती शेती फुलवण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करणारा, शिवकालीन बंधारे बांधून पाण्याचे नियोजन करणे, दैववाद, कर्मकांड यांना विरोध करून विज्ञानवादी जीवन जगणारा सर्व 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून शिवराज्य निर्माण करणारा रायतेचा रक्षणकर्ता म्हणून महाराजांकडे द्रष्टा राजा असे वर्णन केले जाते.

आजच्या पिढीने शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा घेऊन सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन तो विचारांचा ठेवा पुढे चालविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच शिवरायांना अभिप्रेत असणाऱ्या राष्ट्राची निर्मिती होऊ शकते

जय हिंद, जय महराष्ट्र, जय शिवराय (Shivaji Maharaj Speech In Marathi)

Leave a Comment